ब्रेकिंगकला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यशशारदा वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त पारितोषिक वितरण समारंभ...

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यशशारदा वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त पारितोषिक वितरण समारंभ उपअधिक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते पार पडला……

spot_img

सोनई येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “यशशारदा” वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त प्रमुख पाहुणे अहिल्यानगर जिल्हा उपअधिक्षक संतोषजी खाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. ग्रामीण भागात विविध कौशल्य पूर्वक कोर्स, विविध शाखा व निसर्गाच्या सानिध्यात स्थित असणारे महाविद्यालयात या वर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन आज उत्साहात पार पडले. यामध्ये विविध स्पर्धा, पारंपरिक डे, खेळया महाविद्यालयात घेण्यात आले होते.आज कार्यक्रमाची सुरुवात विविध गुणदर्शनाने झाली. यामध्ये विविध नृत्य , डान्स, सिन्गिंग विद्यार्थ्यांनी सादर केले.

प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपअधिक्षक संतोषजी खाडे यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक यांना आपले गुरु मानून मनापासून अभ्यास करावा .आपले आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पाठवत असतात . आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केला पाहिजे.क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये उच्च शिखर गाठावे असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण घेत असताना शिस्त ही खूप महत्त्वाची असते शिस्तीच्या जोरावर जपान हा देश आज प्रगत स्तरावर कार्यरत आहे. असे ते बोलताना म्हणाले.

प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव झिने यांनी विद्यार्थ्यांना करून दिला. मुळा एज्युकेशन सोसायटीचे सहसचिवडॉ. विनायक देशमुख यांचे भाषण झाले. यावर्षीचे कार्यक्रमाधिकारी प्रा. राहुल निपुंगे यांनी अहवाल वाचन केले. या कार्यक्रमास मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे,डॉ अशोक तुवर, यशवंत स्टडी क्लबचे समन्वयक प्रा.सचिन शेटे उपस्थित होते.

कार्यक्रमातील विविध गुणदर्शनाचे परीक्षण डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी केले.प्रा.रवीना शेंडगे,प्रा.भारती सुद्रिक,प्रा.शेहनाज देशमुख यांनी सूत्र संचालन केले.डॉ अशोक तुवर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

हेही वाचा  सोनई शनि शिंगणापूर रस्तावरील अतिक्रमणे 8 दिवसात काढणे नोटिसा जारी......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

दारू दुकाने परवाना बंद करण्यासंदर्भात नवीन नियमावली….

महापालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डातील दारूचे दुकान बंद करायचे असेल तर तेथील एकूण मतदारांच्या ५०...

सोनई शनि शिंगणापूर रस्तावरील अतिक्रमणे 8 दिवसात काढणे नोटिसा जारी……

सोनई शनि शिंगणापूर रस्तावरील अतिक्रमणे 8 दिवसात काढणे नोटिसा जारी...... अतिक्रमण काढण्यासाठी सोनई गावात विविध...

सोनई गावात अतिक्रमण धारकांना नोटीसा….

सोनई गावात अतिक्रमण धारकांना नोटीसा..... महाराष्ट्र राज्यात अतिक्रमण काढण्यासंदर्भात सुरू असलेली जोरदार मोहीम आता सोनई...

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप…….

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप....... 500 रुपयाचा स्टॅम्पपेपर हा...