अनुदानित जगावरील प्राध्यापक भरती प्रस्ताव मंजुरीसाठी अर्थविभागाकडे……
अनुदानित प्राध्यापक भरती प्रक्रियसाठी नवीन जागचा प्रस्ताव अर्थविभागाकडे गेल्याची माहिती मंत्री महोदय यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत . या जागा लोकसेवा आयोगामार्फत भरती होणार अशी चर्चा चालू झाली होती. परंतु या जागा विद्यापीठामार्फत भरण्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषित केले. राज्यात अंदाजे प्राध्यापकांच्या १२ हजार ५२७ जागा रिक्त आहेत. यापैकी फक्त ४ हजार ३०० जागा मंजूर झाल्या आहेत . जर नवीन शैक्षणिक धोरण सक्रियपणे राबवायचे असेल तर या जागा भरण्यास मंजुरी द्यावी. असा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने अर्थ खात्याकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर प्राध्यापक भरतीसाठी वेग येणार आहे.
महाराष्ट्रात ११ विद्यापीठे व १ हजार १७२ अनुदानित महाविद्यालयामध्ये ३३ हजार ७६३ प्राध्यापक सध्या कार्यरत असून जवळ जवळ १२ हजार ५२७ जागा रिक्त आहेत. एकूण मंजूर पद संखेत ३७ टक्के पदे रिक्त असल्याचे दिसते . जर ही पदे भरली गेली नाहीतर राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे अवघड असणार आहे. यात धोरणानुसार ४ हजार ३०० पदे मंजूर झाली. या संदर्भातील प्रस्ताव अर्थ खात्याकडे गेला आहे.
UGC (विद्यापीठ अनुदान आयोगाने) नवीन शैक्षणिक धोरणाची अंमल बजावणी करण्यासाठी प्राध्यापकांच्या ७५ टक्के जागा भरण्याचे निर्देश दिले आहेत. पण हा प्रस्ताव कितपत पूर्ण होईल हे पुढे समजेल.
काही विषयाचे अनुदानित जागा पूर्ण रिकाम्या आहेत. तर काही विषयाच्या पूर्ण भरलेल्या आहेत. एकीकडे त्याच विषयाचे अनुदानित प्राध्यापक लाखोंने पगार घेतात . तर विषय तोच प्राध्यापक पात्रता तीच परंतु विना अनुदानित म्हणून पगार मात्र एकदम कमी असे धोरण राज्य शासनाचे कधी बदलणार. एकीकडे गुणवत्ता पाहिजे नवीन धोरण राज्य राबवितात त्याची अमलबजावणी खरंच होणार का हे बघावे लागेल.