सोनई गावात अतिक्रमण धारकांना नोटीसा…..
महाराष्ट्र राज्यात अतिक्रमण काढण्यासंदर्भात सुरू असलेली जोरदार मोहीम आता सोनई गावात व परिसरात येऊन पोहोचली आहे नुकत्याच आलेल्या नोटिसानुसार सोनई गावात विविध ठिकाणावरून रस्ते महामार्ग येणार आहेत यामध्ये सर्वात आधी पानेगाव ते चांदा हा रस्ता सोनई मार्गे परिपूर्ण होणार आहे पानेगाव मध्ये अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे तर सोनई ते हनुमान वाडी परिसरात रस्त्यात येणाऱ्या नळ्यांचे काम चालू आहे
सोनई गावात व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण कौतुकी नदी अतिक्रमण लवकरच सुरू होणार आहे हे अतिक्रमण काढताना बांधकाम विभागाने एक जीआर काढला आहे यामध्ये रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा मीटर अंतरापर्यंत अतिक्रमण काढले जाईल काही गावांमध्ये हे अतिक्रमण कमी करून 39 फूट पर्यंत केले आहे यामध्ये अतिक्रमण अंतर्गत विविध दुकानदारांचे नुकसान होणार आहे ग्रामपंचायत स्तरावर नोटीसांचा भडीमार चालू झाला आहे लोकांमध्ये संभ्रमांचे वातावरण निर्माण आहे काही लोकांची वर्षानुवर्ष राहत असलेली घरे सुद्धा या अतिक्रमण सर हद्दीमध्ये येतात ही घरे जर पाडली तर त्या लोकांचा निवारा हा काढला जाणार आहे त्यांना ग्रामपंचायत दुसरीकडे जागा उपलब्ध करून देणार का हा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे
काही गावांमध्ये विविध ठिकाणी लोकांनी रस्ता रोको केला परंतु प्रशासनाकडून त्यांना नोटीसा देण्यात गेले त्यामुळे ही अतिक्रमण काढणे मोहीम ही जलद गतीने चालू आहे
सोनई गावामध्ये कौतुकी नदी परिसर पूर्ण स्वच्छ केला जाणारा असून यामध्ये येणारे सर्व अतिक्रमण काढले जाणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे या नदीपात्रातील अतिक्रमण संदर्भात प्रत्येकांना ग्रामपंचायत तर्फे या आधीच नोटीसा पाठविण्यात आले आहेत
दोन दिवसात सर्वांना नोटीसा देऊन पुढील आठवड्यामध्ये अतिक्रमण काढले जाणार असल्याची माहिती स्थापत्य अभियंता श्रेयस तरवडे यांनी दिली आहे