देशराहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी लवकरच होणार भूसंपादन....

राहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी लवकरच होणार भूसंपादन….

spot_img

राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच भूसंपादन केले जाणार आहे.

भारतीय रेल्वे मंत्रालयाने जिल्ह्यातील राहुरी ते शनीशिंगणापूर दरम्यान २१.८४ किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. सुमारे ४९४.१३ कोटी रुपयांच्या खर्चातून हा मार्ग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवार यांनी दिली.

शनी शिंगणापूरला दररोज विविध राज्यांमधून भाविक भेट देत असतात. लाखोंची उलाढाल देवस्थान मध्ये होत असते शनि शिंगणापूर हे देवस्थान भारतभर चर्चित आहे नुकतीच भारताचे राष्ट्रपती या देखीव शिंगणापूरला येऊन गेल्या आहेत. गर्दी लक्षात घेता येथे रेल्वे स्थानक होणे गरजेचे आहे नवीन रेल्वे मार्गामुळे भाविकांसह राहुरी, नेवासा आणि परिसरातील नागरिकांच्या प्रवास सुखकर होणार आहे.

रेल्वे मार्गामुळे साई शिर्डी मंदिर , राहुरी येथील राहु-केतू मंदिर, शनि मंदिर मोहिनीराज मंदिर, पैसखांब मंदिर आदी धार्मिक पर्यटनस्थळांना चालना मिळणार आहे.

केंद्रिय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवार यांच्यासह प्रवासी संघटनेचे हरजितसिंग वाधवा यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शनिशिंगणापूर हे भारतातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र असून, या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधा मजबूत होतील व पर्यटनाला चालना मिळेल, असे डुंगरवाल यांनी सांगितले.

सोनई मधील कान्हेर वस्ती ,हनुमानवाडी,कारखाना ,कांगोणी येथे रेल्वे विभागाने मार्गासाठी पाहणी केली आहे

हेही वाचा  यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर.......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

सोनई येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयास मान्यता….

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई देवगडच्या श्री गुरूदेव दत्त पिठाचे भक्त…

नेवासा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नव्यानेच नियुक्त झालेले सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब हे...

शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांसाठी 2 लाख 36 हजार1 उमेदवारांचे अर्ज….

महाराष्ट्र राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' अर्थात TAIT या परीक्षेसाठी अर्ज करण्याची...

अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन शिक्षण विभागाचा निर्णय……

महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत सूसुत्रता आणण्यासाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी...