नेवासा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नव्यानेच नियुक्त झालेले सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब हे नेवासा तालुक्यातील देवगडच्या श्री गुरूदेव दत्त पिठाचे भक्त आहे. दिल्ली व संभाजीनगर खंडपीठामध्ये मुख्य न्यायाधीश असतांना त्यांनी अनेकवेळा आपल्या कुटुंबासमवेत देवगड येथे येऊन भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले आहे. श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयात तर त्यांनीअजान वृक्षाखाली बसून किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायण देखील केले होते. सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे आपल्या कुटुंबियांसमवेत आवर्जून दत्त दर्शनासाठी येत असतात मागील वर्षी देखील छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असतांना श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधी सह भगवान दत्तात्रयांचे ते आवर्जून दर्शन घेत.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषणजी गवई साहेब यांची निवड झाल्याबद्दल गुरूदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत राष्ट्र संत श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. देवगड भक्त परिवाराने देखील भूषणजी गवई यांच्या निवडीचे स्वागत व अभिनंदन करून निवडी बद्दल समाधान व्यक्त केले.