मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार……
राहुरी तालुक्यात 1972 साली स्थापन झालेले मुळा कालवा अंतर्गत येणारे अतिक्रमण काढण्या संदर्भात नुकतीच नोटिसा देण्याची मोहीम राबविली गेली आहे .राहुरी नेवासा शेवगाव तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा या कालव्यातून केला जात आहे.या धरणाला एकूण 11 दरवाजे असून त्यातील पाणी विसर्ग केला जातो. या धरणाची उंची ६७.६८ मी (सर्वोच्च)
लांबी : २८५६.७ मी आहे .यामध्ये उजवा कालवा 52 किमी तर डावा कालवा 18 किमी असा विस्तार आहे.मुळा धरणाच्या कालवे आणि वितरिकांवरील 860 अतिक्रमणांना हटविण्याची जलसंपदा विभागाने मोहीम सुरू केली आहे. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या असून, अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पोलिस बंदोबस्तात केली जाईल.50 वर्षांमधील सर्वात मोठी कार्यवाही असणार आहे पाणी पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी ही कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.नेवासा राहुरी तालुका लोकप्रतिनिधी आमदार याकडे लक्ष घालणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कालवा परिसरातील लोकांनी गाईसाठी शेड ,कांदा चाळ ,धान्य साठवण शेड बांधली आहे आता ही अचानक कसे पाडणार या आधी प्रशासनाने कोणालाच अडवले नाही .पण आता नेमके शेतकऱ्यांनी पावसा अगोदर कांदे काढून शेड मध्ये भरले आहे आता जर अतिक्रमण काढली तर हा कांदा काय करायचा ,असा प्रश्न शेतकरी यांच्या समोर उभा आहे.
शेतकरी हा आधीच आर्थिक बाजूने स्थिर नाही आता आणखी अतिक्रमण मोहीम राबवून नुकसान करू नये अशी मागणी सोनई गावचे प्रगतशील शेतकरी शाम येळवंडे यांनी प्रशासनास केली आहे.