राजकारणनेवासा तालुक्यातील 58 गावाचा कारभार आता महिलेच्या हाती.....

नेवासा तालुक्यातील 58 गावाचा कारभार आता महिलेच्या हाती…..

spot_img

नेवासा तालुक्यातील सरपंच पदाचा कारभार आता महिलेच्या हाती गेला आहे.
नेवासा तालुक्यातील
११४ गावांपैकी ५८ गावाचा सरपंच म्हणून सरपंच पदाचा कारभार महिलाच्या हाती गेला तर ५६ गावांत सरपंच म्हणून पुरुष राहील. आज झालेल्या महिला आरक्षण सोडतमध्ये ८८ पैकी ४७गावांत पुरुषांच्या, तर ४१ गावांत महिला आरक्षणाच्या चिठ्या निघाल्या आहेत.

सोनई, कुकाणे, पानेगाव, चांदे, खरवंडी या प्रमुख गावात महिला आरक्षण राहील

नेवासे तहसील कार्यालयात आज उपजिल्हाधिकारी मनीषा राशिनकर, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सोनाली म्हात्रे, तहसीलदार डॉ. संजय बिरादार व नायब तहसीलदार किशोर सानप यांच्या उपस्थितीत काश्वी अमोल मालुंजकर (वय ५) व आशिष प्रशांत कांबळे (वय ७) यांच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्ठया काढण्यात आल्या.

२०२१च्या आरक्षणसह तालुक्यात अनुसूचित जातीसाठी नऊ, जमातीसाठी चार, मागास प्रवर्गासाठी १५, तर सर्वसाधारणसाठी २८ गावांत महिलाराज असणार आहे.

अंमळनेर, खुणेगाव, उस्थळ खालसा, बहऱ्हाणपूर, सुरेगाव गंगा व मांडेगव्हाण येथे अनुसूचित जाती महिला सरपंच राहील. पानेगाव, वाटापूर, निंभारी व जळके बुद्रुक गावात अनुसूचित जमातीचा सरपंच राहील. सोनई, कुकाणे, पुनतगाव, खडका, देडगाव, भानसहिवरे, भेंडे बुद्रूक, नारायणवाडी, घोगरगाव, दिघी व मंगळापूर गावात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंच असतील. माळीचिंचोरे, शिरेगाव, वडाळा, कौठा, जेऊर हैबती, माका, बेलपिंपळगाव, चांदे, रांजणगाव, सौंदाळा, बहिरवाडी, पाचुंदे, खरवंडी, सलाबतपूर, पाचेगाव, टोका, शिंगवे तुकाई, वरखेड, नजीक चिंचोली व सुलतानपूर गावात सर्वसाधारण महिला सरपंच म्हणून कारभार पाहतील.

spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर…..

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर.. राज्यातील काही ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच...

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर…….

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर....... यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल युजीसीच्या संकेतस्थळावर...

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार……

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार...... राहुरी तालुक्यात 1972 साली स्थापन झालेले मुळा कालवा अंतर्गत...

किरण बोरुडे यांची आर्मीमध्ये निवड……

किरण बोरुडे यांची आर्मीमध्ये निवड...... ...