सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष २०२५-२६-करीता पॉलिटेक्नीक (तंत्रनिकेतन) च्या विविध शाखांना AICTE नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांची मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी दिली आहे.
या महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजीनियरिंग, आर्टिफिशीअल इंटेलिजन्स अॅण्ड मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेली कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत
१० वी नंतर पॉलिटेक्निक इंजिनिअरींगला प्रवेश घेतल्यास ११ वी व १२ वी करतांना JEE व MH-CET या स्पर्धात्मक परिक्षा देण्याची गरज नाही. पॉलिटेक्निक डिप्लोमा झाल्यानंतर IT कंपन्यांमध्ये थेट नोकरी मिळू शकते. किंवा इंजिनिअरींग कॉलेजला डायरेक्ट द्वितीय वर्षाला अॅडमिशन मिळू शकते.
ग्रामीण भागातील विद्यार्थी इंजिनेरिंगचे कोर्स करण्यासाठी शहरी भागात जातात परंतु तेथील खर्च हा गरिब मुलांना परवडणारा नसतो.ग्रामीण भागात आता हे कोर्स उपलब्ध झाल्याने परिसरातील विद्यार्थी पालक या वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.जेष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब यांनी शिक्षणाचा पाया सोनई गावात रवला आहे.विविध विद्यार्थी कमी खर्चात शिक्षण घेऊन आज विविध ठिकाणी नोकरी करत आहे आता नवीन आधुनिक शिक्षण घेऊन आणखी भरारी घेतील असे साहेब यांनी सांगितले आहे
सोनई महाविद्यालय हे निसर्गाच्या सानिध्यात स्थित आहे.येथील वातावरण मनाला मोहक आनंद निर्माण करणारे आहे.येथील प्रयोगशाळा,ग्रंथालय,क्रीडांगण बघण्यासारखे आहे.