नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर..
राज्यातील काही ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली असून नेवासा तालुक्यातील काही गावाची सोडत आरक्षण निहाय जाहीर झाली आहे.त्यामुळे गावपातळीवर तरुण युवक तयारीला लागले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निधी आता थेट ग्रामपंचायतिला मिळत असतो या निधीमधून गावाचा विकास व विविध कामे करता येत असतात.
ग्रामपंचायत स्तरावर अनेक योजना राबवल्या जातात. यात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या योजनांचा समावेश असतो. या योजनांचा मुख्य उद्देश ग्रामस्थांच्या जीवनमान सुधारणे, विकास साधणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे आहे.
नेवासा तालुक्यातील काही ग्रामपंचायत आरक्षण बदल झाल्याने युवक वर्ग निवडणूकसाठी तयारीला लागला आहे