महाराष्ट्रदारू दुकाने परवाना बंद करण्यासंदर्भात नवीन नियमावली....

दारू दुकाने परवाना बंद करण्यासंदर्भात नवीन नियमावली….

spot_img

महापालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डातील दारूचे दुकान बंद करायचे असेल तर तेथील एकूण मतदारांच्या ५० टक्के मतदान बाजूने व्हायलाच हवे, ही अट रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

आता ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले तरी ते ग्राह्य धरले जाईल. झालेल्या एकूण मतदानाच्या ७५ टक्के मतदान हे दारू दुकानाच्या विरोधात असेल तर ते दुकान तत्काळ बंद केले जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बीअर आणि दारू दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल भाजपचे महेश लांडगे आणि राहुल कुल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. महापालिका वॉर्डात एकूण मतदारांच्या ५० टक्के मतदारांची अट बदलून ती झालेल्या मतदानाच्या ५० टक्के करण्यात यावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती.

सोसायट्यांची एनओसी अनिवार्य :

राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या 1281 व्यावसायिक गाळ्यात बीअर किंवा दारूचे दुकान सुरू करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक राहील, असेही अजित पवार यांनी जाहीर केले.

हेही वाचा  किरण बोरुडे यांची आर्मीमध्ये निवड......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

नेवासा तालुक्यातील 58 गावाचा कारभार आता महिलेच्या हाती…..

नेवासा तालुक्यातील सरपंच पदाचा कारभार आता महिलेच्या हाती गेला आहे. नेवासा तालुक्यातील ११४ गावांपैकी ५८ गावाचा...

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर…..

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर.. राज्यातील काही ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच...

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर…….

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर....... यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल युजीसीच्या संकेतस्थळावर...

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार……

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार...... राहुरी तालुक्यात 1972 साली स्थापन झालेले मुळा कालवा अंतर्गत...