राहुरीसोनई गावचे भूमिपुत्र डॉ शरद गडाख यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा...

सोनई गावचे भूमिपुत्र डॉ शरद गडाख यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा अतिरिक्त कारभार स्विकारला……

spot_img

सोनई गावचे भूमिपुत्र डॉ शरद गडाख यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा अतिरिक्त कारभार स्विकारला……

सोनई गावचे भूमिपुत्र डॉ शरद गडाख यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचा कुलगुरु पदाचा अतिरिक्त कारभार नुकताच देण्यात आला.सध्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर शरद गडाख यांच्याकडे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. डॉ शरद गडाख या अगोदर राहुरी विद्यापीठ मध्येच संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्यरत होते. डॉ शरद गडाख यांचे नियुक्ती शासनाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 19 सप्टेंबर 2022 पासून कुलगुरू या पदावर केलेली आहे.

राहुरी विद्यापीठ मध्ये कार्यरत असताना डॉक्टर शरद गडाख यांनी विविध पिकांचे 19 वाण विकसित केले होते. त्यांनी आतापर्यंत 26 तांत्रिक लेख 68 संशोधन लेख व 128 विस्तारलेख, विविध प्रकाशने केले आहेत. तसेच त्यांनी विद्यापीठाची पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न केले. विविध फळांचे प्रात्यक्षिक, प्रत्येक जिल्ह्यात फळबाग लागवड क्षेत्र वाढवणे, फळाची विक्री केंद्र सुरू करणे असे विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत.

डॉ शरद गडाख बोलताना म्हणाले,3000 एकर क्षेत्रावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबविल्यामुळे विद्यापीठाचा महसुली उत्पादनात 40 कोटीपर्यंत वाढ झाली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी गावांमध्ये मॉडेल व्हिलेज संकल्पना राबवल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे व त्यांची परिस्थिती सुधारली आहे असे प्रतिपादन त्यांनी केले

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. डॉ.नितीन दानवले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन सदाफळ यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे सांगता झाली.

हेही वाचा  मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

नेवासा तालुक्यातील 58 गावाचा कारभार आता महिलेच्या हाती…..

नेवासा तालुक्यातील सरपंच पदाचा कारभार आता महिलेच्या हाती गेला आहे. नेवासा तालुक्यातील ११४ गावांपैकी ५८ गावाचा...

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर…..

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर.. राज्यातील काही ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच...

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर…….

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर....... यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल युजीसीच्या संकेतस्थळावर...

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार……

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार...... राहुरी तालुक्यात 1972 साली स्थापन झालेले मुळा कालवा अंतर्गत...